''महाराष्ट्राच्या विकासाचा वटवृक्ष ''या 'रचना शिल्पाचे अनावरण करून सतेज सेवा सप्ताहाची सांगता
कोल्हापूर – विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. सतेज पाटील यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने सतेज सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सेवा सप्ताहामध्ये महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योगा वर्ग, प्राणी व मनुष्य यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी पाणवठा, पर्यावरणपूरक पक्षांची घरटी बनवण्याची कार्यशाळा, पन्हाळा किल्ल्यावरील बुरुजांची स्वच्छता, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर आदि उपक्रम राबवण्यात आले. यावेळी ''महाराष्ट्राच्या विकासाचा वटवृक्ष ''''या 'रचना शिल्पाचे' अनावरण आ. सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यांना हे शिल्प भेट देण्यात आले.
या सप्ताहाची सांगता खासदार शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील, जयशंकर पाठक, प्रतिभाताई धानोरकर, सुनील मलके, राहुल वरदा, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक राजेश लाटकर आणि कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे कार्यकर्ते आदींच्या उपस्थित झाले.