...या गोष्टींमधून राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच महान व्यक्तींना खरी श्रद्धांजली ठरेल : राज ठाकरे
मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत, हार – तुरे, महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे, कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे, यावर भाष्य केले आहे.
त्यांनी म्हटले आहे कि, छत्रपती शिवाजी महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभे करणे, त्यांना जातीत पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जाती धर्मात फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो ! नाहीतर ह्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापूरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापीपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू, असे म्हणत त्यांनी सध्याच्या वस्तुस्थितीवर लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.