अट्टल दुचाकी चोरटयाला अटक...एलसीबीची कारवाई
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यादवनगरातील उमेश गायकवाड हा अट्टल दुचाकी चोरटा चोरीची दुचाकी घेऊन कळंब्यातील एका हॉटेल परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गायकवाड याला अटक केली. त्याच्याकडून भुदरगड आणि सांगली शहरातील दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीला आणत चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.