बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी आज घेतली शपथ... 

भाजपकडून बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू 

<p>बिहारच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी आज घेतली शपथ... </p>

पटना – २० वर्ष बिहारचे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी काल बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज राज्यपालांनी सम्राट चौधरी यांना बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. यामुळे भाजपचे सम्राट चौधरी हे बिहारचे चोविसावे मुख्यमंत्री ठरले आहेत.
भाजपने बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न लागू करत बिहारला दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत.  त्यानुसार  जेडीयू कोट्यातून बिजेंद्र यादव आणि विजय चौधरी  यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला नितीश कुमार उपस्थित होते.