कर्नाटक सरकारमध्ये राजकीय खळबळ...
बेंगलुरु – कर्नाटकमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विरोधात नाराजी असल्याने आमदारांनी मुख्यमंत्री बदलाच्या मागणीवर जोर धरला आहे. त्यामुळे आमदारांनी “जोपर्यंत जुने चेहरे हटवले जात नाहीत, तोपर्यंत नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार नाही”, असा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी सत्ताधारी सरकारमधील 30 काँग्रेस आमदारांनी बंडाची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी 30 आमदार एकत्र मिळून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. हे 30 आमदार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आता या आमदारांच्या मागण्यांबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेते हे पहावे लागणार आहे.