मुंबई – आज मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रववक्ते संजय निरुपम, शीतल म्हात्रे, संजय निरुपम, शायना एनसी, आनंद दुबे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडण्याचा अजब प्रकार झाला. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावर बोलताना आ.विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनीही हल्लाबोल केला आहे.
कालच बाळासाहेबांची स्मृती दिवस होता, आज बाळासाहेबांचा फोटो फाडला याचे भान नाही, हा निर्लजपणाचा कळस असल्याचे आ.विजय वडेट्टीवार यांनी,म्हटले आहे. तसेच नाना पटोले यांनी, भाजप आणि त्यांचे मित्र घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं सांगितलं.सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची लोकप्रियता पाहता हे सगळे घाबरले आहेत. प्रसिद्धीसाठी हे सगळं केले आहे, या प्रवक्त्यांनी 2 पापं केली आहेत . एका अशा महिलेचे पुस्तक त्यांनी फाडले, जिने पूर्ण आयुष्य लोकांसाठी घालवले आणि आपल्या पतीचा मृत्यू पाहिला. त्याचबरोबर बाळासाहेबांचाही फोटो यांनी फाडला, ही दोन पापं त्यांनी केली आहेत . त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तसेच देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.




