मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर येत आहेत. यावेळी पुण्यातील जिल्हा परिषदेच्या आवारात अजित पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी येणार आहे. यावर आ. रोहित पवार यांनी ट्वीट करून, “केवळ पुतळा अनावरणापुरतं दादांचं कर्तृत्व सिमीत करण्याऐवजी पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव देण्याची आणि दादांच्या अपघाताची CBI चौकशी करण्याची घोषणा शाह साहेबांनी केली तर अधिक बरं राहील, अन्यथा दादांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिंग रोडला नाव देण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन उभारू..!”, असा इशारा दिला आहे.
आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि, “देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याचं समजतंय. पुणे जिल्हा परिषदेत सत्ता असल्याने दादांना मानणाऱ्या जिल्हा परिषदेतील नेत्यांनी पुतळा उभारला याबद्दल त्यांचे आभार! पण अजितदादांमुळं राज्याच्या सत्तेत मंत्रीपदे उपभोगणाऱ्यांना पुणे रिंगरोडला दादांचं नाव असावं असं वाटत नाही का?
अजितदादांचं राज्याच्या विकासातील योगदान हे अमूल्य होतं तसंच दादा सुमारे दशकभराहून अधिक काळ पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते, तरी दादांचं नाव एखाद्या मोठ्या प्रकल्पाला देऊ नये, अशी काही व्यक्तींची भूमिका आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.




