मुंबई – राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत नेते मंडळींसह सर्व स्तरातून चर्चा रंगू लागली आहे. यावर खा. संजय राऊत यांनी, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विलीनीकरणाचा खेळ घ्यायला पाहिजे. हा एक अप्रतिम खेळ चालू आहे”, अशी बोचरी टीका केली आहे.
खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे कि,प्रफुल्ल पटेलांनी मर्जर-मर्जर नावाची संघटना स्थापन करावी. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आयपीएल चाललंय, पण राष्ट्रवादीचा सध्याचा सामना शेवटपर्यंत अनिर्णित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.




