मुंबई – गोकुळमध्ये बहुमत असलेल्या समविचारी आघाडीला डावलून महायुतीने शासन नियुक्त चार संचालकांच्या मतांवर आपला अध्यक्ष नियुक्त केला आहे. यावर खा. संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
समविचारी पॅनलला स्पष्ट बहुमत असताना भाजपने राजकारण केले आहे. लोकशाहीमध्ये जय पराजय पचवायची ताकद लागते. भाजपमध्ये पराभव पचवण्याची हिंमत आणि नैतिकता दिसत नाही, अशी सडकून टीका खा. संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.




