राजकीय

गोकुळ सत्तासंघर्ष : …तर मग निवडणुका घेता कशाला? : सरकारला घरचा आहेर

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

ही पद्धत लोकशाहीसाठी घातक : आ. बच्चू कडू

मुंबई – गोकुळ दुध संघात महायुतीकडून रडीचा डाव खेळत राज्य सरकारने सहकाराचा नवीन कायदा आणला आहे. यावर राजकीय नेत्यांसह दुध उत्पादकांकडून संताप व्यक्त होत आहे. यावर शिंदेचे आमदार बच्चू कडू यांनी, “स्वीकृत सदस्यांना कुठेही मतदानाचा अधिकार नसतो, निवडणुकीनंतर अशा प्रकारे अधिकार देण्याची ही पद्धत लोकशाहीसाठी घातक आहे. असे असेल तर मग निवडणुका घेता कशाला?”, असा घरचा आहेर त्यांनी महायुती सरकारला दिला आहे.

आ. बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, “आज आपल्याला तात्पुरते हे बरे वाटत असेल, पण हीच पद्धत जर उद्या वाढत गेली, तर मग लोकांचे मतदान घेण्याची गरजच काय उरते? मग निवडणूकच कशाला घ्यायची? त्यापेक्षा वरूनच परस्पर सगळे संचालक आधीच नेमून दिले असते तर निवडणूकच झाली नसती आणि सगळेच संचालक तुमचे झाले असते. लहान गुन्हा करण्यापेक्षा थेट मोठाच गुन्हा केला असता,” असा टोला त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top