मुंबई – गोकुळ दुध संघाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकारात राजकीय एन्ट्री झालीय. त्यामुळे गोकुळचा तिढा अधिकच वाढला आहे. त्यात महायुतीच्या नेत्यांना गोकुळचा पराभव मान्य होत नसल्याने शासकीय प्रतिनिधींच्या नियुक्तीचा घाट घातला जात आहे. त्यामुळे दुध उत्पादकांसह राजकीय नेत्यांमधून संताप व्यक्त होत आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना थेट सवाल विचारला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे कि, चोराच्या मनात चांदणे ! देवेंद्र फडणवीस सरकारला गोकुळची (सहकारा) एवढी चिंता होती ? तर, सत्तेच्या दलालांच्या (मंत्र्यांच्या) सोयीचा निर्णय घ्यायला नको हवा होता, की ! प्रशासक नको म्हणून मागच्या दरवाजाने चार संचालक घुसवण्या ऐवजी कालच्या कॅबिनेटमध्ये सभेचा “कोरम साध्या बहुमताचा असावा” असा निर्णय घेता आला असता. गावाचं गोकुळ होऊ द्यायचं, मथुरेला (अमूल) दूध नाही जाऊ द्यायचं.




