मुंबई – खा. शरद पवार हे आजारी असल्याने सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरनाबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
अजितदादा आज हयात असते तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आज एकत्र दिसले असते. मात्र अजितदादांच्या निधनामुळे विलिनीकरणाची चर्चा मागे पडली, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा त्यावेळी नक्की झाली होती. स्वर्गीय दादांनी मला त्याबाबतची कल्पनाही दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे.




