राजकीय

खासदार शरद पवारांची अनेक नेत्यांनी रुग्णालयात घेतली भेट

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेते मंडळी त्यांची भेट घेत आहेत.
यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, आ. विश्वजीत कदम ,उद्योगपती गौतम अदाणी आदींनी रुग्णालयात जाऊन पवार यांची भेट घेतली आहे.
खा.शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थामुळे सुरुवातीला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. २ नोव्हेंबर रोजी त्यांना छातीत दुखणे आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, पुण्यातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर काही तासांतच त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top