राजकीय

तुम्ही मला सरकारी यंत्रणेतून धमकी देऊ नका, तुम्हाला लढायचं असेल तर आमने-सामने लढा : आ. सतेज पाटील यांचं मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

जनतेचा जनादेश बाजूला ठेवून तुम्ही असं करत असाल तर न्यायालयच आम्हाला न्याय देईल : आ. सतेज पाटील

कोल्हापूर – आज गोकुळ दुध संघाच्या अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर आ सतेज पाटील यांनी, जनतेचा जनादेश बाजूला ठेवून महायुती असं करत असेल, तर न्यायालयच आम्हाला न्याय देईल, अशी भूमिका पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
अध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सभा घेतली. त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ. सतेज पाटील यांच्यावर टीका केली. यावर बोलताना आ. सतेज पाटील यांनी, चंद्रकांतदादा कोल्हापूरचे आहेत. ते जेवढे मोठे होतायत, तेवढे त्यांची वैचारिक पातळी खाली चालली आहे. स्वर्गीय डी वायदादा यांचा अपमान त्यांनी केला आहे त्याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. तुम्ही मला सरकारी यंत्रणेतून धमकी देऊ नका, तुम्हाला लढायचं असेल तर 2029 मध्ये आमने-सामने लढा, असं प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिलं.

पुढे आ. सतेज पाटील म्हणाले कि, अध्यक्षपदासाठी कोरम लागत नाही. त्यामुळे कोरमचा विषयच नव्हता. महाराष्ट्रासह महायुतीचे अनेक नेते सांगतायेत हे चुकीच झालंय तरीही कोरमचा विषय ते म्हणत आहेत. आता आम्हाला कोर्टाकडून अपेक्षा आहे. जनतेचा जनादेश बाजूला ठेवून असं तुम्ही करत असाल, तर न्यायालयच आम्हाला न्याय देईल. कालच्या मोर्चात कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी लोकांचा आक्रोश पहायला मिळाला.

आजच्या महायुतीच्या सभेत महायुतीच्या नेत्यांचे चेहरे आम्ही बघितले. ते किती प्रसन्न होते हे सर्वांनी बघितलं आहे. नेत्यांच्या चेहऱ्यावर किती तेज होतं हे आजच्या व्हिडिओ मधून दिसून आले आहे त्यांनाही वाटत होतं हे कुठेतरी चुकतय. विजयाचा उन्माद आज कोणाचा दिसला हे सर्वांनी बघितले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top