मुंबई – राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विलिनीकरणाबाबत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात माझ्याच उपस्थितीत चर्चा झाली होती, अजित पवार चांगलं नेतृत्व करत आहेत, तुम्ही एकत्र आलं पाहिजे असे मी त्यांना म्हणालो होतो. त्यावेळी, 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली होती, असा दावा मंत्री भुजबळ यांनी केला आहे.
माझं ऑपरेशन झालं होतं, मी आजारी असताना मला भेटण्यासाठी जयंत पाटील आले होते, त्यावेळी आपण सगळ्यांनी एकत्र यावे असे मी जयंत पाटलांना म्हटलं. पण, जयंत पाटील बोलले तुम्ही सत्तेत एनडीएसोबत आहात, तुमच्या सह्योगी पक्षाला चालणार का? तेव्हा मी म्हटलो पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत ते बघतील. संस्थापक अध्यक्ष शरद पवार आहेत, चर्चा होईल. पण पुढे काही झाले नाही, अजित पवार नाहीत पण जयंत पाटील आहेत, असेही मंत्री भुजबळ यांनी म्हटले आहे




