मुंबई – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून, “संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”, असा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकारणात उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, “माझ्या पूर्वपरवानगीशिवाय कोणीही माझे नाव, फोटो, ओळख किंवा माझ्या विशिष्ट शैलीचा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ, फिल्म, रील, टीझर, प्रमोशन किंवा इतर कोणतेही साहित्य तयार करण्यासाठी, वापरण्यासाठी किंवा प्रसिद्ध करण्यासाठी वापर केल्यास, अशा व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. असे आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर साहित्य जप्त करण्याची मागणी केली जाईल आणि संबंधित व्यक्तीला फौजदारी तसेच दिवाणी कायदेशीर कारवाईला व शिक्षेला सामोरे जावे लागेल.”




