कोल्हापूर – पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख – जाधव या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुष्प गुच्छ देवून त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांनी आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांचीही भेट घेतली. दरम्यान आमदार हर्षदा देशमुख – जाधव यांनी, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका यावेळी व्यक्त केली.




