बीड – “मी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत उभा राहणार असून निवडूनही येणार आहे, एवढंच नाही, तर शिव्या देऊन का असेना, लोक मला मतदान करतील, असं वक्तव्य खासदार बजरंग सोनवणे यांनी केले आहे. गेवराई तालुक्यातील श्रृंगऋषी गडावर आयोजित लोकलढा आंदोलनाच्या बैठकीत ते बोलत होते.
मागच्या वेळीही लोकांनी मला मतदान केलं, यावेळीही करतील, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी खासदार झालोय, मग यापूर्वीचा खासदार कुठे होता, त्याने कुठे रस्ता केला, कुठे नाली बांधली, हे विचारू का, असा थेट सवाल खा. सोनवणे यांनी उपस्थित केला.




