आरोग्य

आता १०८ रुग्णवाहिकेत होणार आयसीयू दर्जाचे उपचार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी घोषणा

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नागपूर – ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून राज्यातील १०८ रुग्णवाहिकेत रुग्णाला घेतल्याक्षणी आयसीयू दर्जाचे उपचार दिले जाणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली आहे. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.

येत्या २ डिसेंबरला मुंबईत या अद्ययावत १०८ सेवेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. यावेळी ३०० नव्या रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. या रुग्णवाहिकांमध्ये आयसीयू बेडच्या धर्तीवर डॉक्टर्स आणि अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा सज्ज असतील. यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यापूर्वीच प्रवासादरम्यान तात्काळ उपचार सुरू करता येणार आहे.

संबंधित विषय

Scroll to Top