मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रवक्त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुस्तका विरोधात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र सर्वांदेखत फाडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
त्यांच्याकडून झालेल्या या गंभीर चुकीमुळे थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावून घेतले आहे. शायना एन सी या काहीवेळापूर्वीच विधानभवनात पोहोचल्या आहेत.




