कोल्हापूरातील सकल मराठा समाजाचा मनोज जरांगेंना पाठींबा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत सकल मराठा समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी राज्य सरकारच्या धोरणां विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महार-ाजांनी बहुजन समाजाला दिलेला आरक्षणाचा हक्क आणि कोल्हापूर गॅझेटमधील ऐतिहासिक नोंदींच्या आधारे मराठा समाजाला तत्काळ ओबीसींमधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आंदोलकांनी केलीय.

शासनानं मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून ओबीसी प्रवर्गातून हक्काचं आरक्षण देण्याचा निर्णय त्वरित घ्यावा. अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही. जरांगे पाटील यांच्या लढ्याला कोल्हापूरचा पूर्ण पाठिंबा असून मागणी मान्य होईपर्यंत हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासह गनिमी काव्यानं मुंबईच्या दिशेनं जाऊ असा इशारा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिलाय

आंदोलनात बाबा महाडीक, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, प्रवीण पाटील, रुपेश पाटील, यांच्या सह सकल मराठा समाज बांधवांनी सहभाग घेतला.

Scroll to Top