इतर

‘बिग बाजार’च्या संस्थापकांवर गुन्हा दाखल…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – उद्योगपती ‘बिग बाजार’चे संस्थापक किशोर बियाणी आणि संचालक राकेश बियाणी यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाची तब्बल 904.32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने बियाणी कुटुंबियांच्या आणि फ्युचर रिटेलच्या मुंबईतील विविध ठिकाणांवर छापेमारी करत महत्त्वाचे कागदत्रे जप्त केली आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट शाखेने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फ्युचर रिटेलने एसबीआयसह 9 बँकांच्या कंसोर्शियमकडून वर्किंग कॅपिटल, टर्म लोन आणि लेटर ऑफ क्रेडिटच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, बँकेचे फॉरेन्सिक ऑडिट केले असता कंपनीच्या व्यवहारात मोठे गैरव्यवहार समोर आले. एसबीआयने 23 मार्च 2026 रोजी फ्युचर रिटेलचे खाते अधिकृतपणे ‘फसवणूक’ म्हणून घोषित केले होते.
बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा वापर ज्या कारणासाठी मंजूर झाला होता त्यासाठी न करता, हे पैसे बियाणी यांच्याशी संबंधित इतर कंपन्या आणि संस्थांकडे वळवण्यात आले आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार, बनावट लेखा नोंदी करणे आणि कंपनीची खरी आर्थिक स्थिती लपवणे असे प्रकार घडल्याचे ऑडिटमध्ये निष्पन्न झाले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top