इतर

मिशन सुधार योजनेला स्थगिती द्या : रास्त भाव धान्य दुकानदार महासंघाची मंत्री मुश्रीफांकडे मागणी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  दुष्काळसदृश परिस्थिती, वाढती महागाई आणि आर्थिक अडचणींनी त्रस्त असलेल्या गोरगरीब जनतेला स्वस्त धान्याच्या लाभापासून वंचित ठेवू नका, अशी भूमिका मांडत मिशन सुधार’ मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईला स्थगिती दयावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाने केली आहे. याबाबत महासंघाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्मंडळाने आज मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या प्रश्नावर मुख्यमंत्र्याशी चर्चा करून स्थगिती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संदीप लाटकर, संतोष सांगले, साताप्पा शेनवी, जयवंत निकम, अरविंद दंडवते, पांडुरंग निकम, सुभाष कांबळे, दिलीप पाटील, पंडित पाटील, विष्णू पावले, संजय पाटील, रमेश खंदारे, नामदेव खतकर आणि ओंकार चौगुले आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top