पिंपळगावमधील घरफोडीचा एलसीबीने चोवीस तासात लावला छडा... दोघांना अटक

<p>पिंपळगावमधील घरफोडीचा एलसीबीने चोवीस तासात लावला छडा... दोघांना अटक</p>

कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे महादेव चव्हाण हे कुटुंबियांसह राहतात. रविवारी सकाळी ते कामानिमित्त कुटुंबियांसमवेत बाहेर गेले होते. यावेळी अज्ञातांनी चव्हाण यांच्या घरातील सुमारे १५ लाख रुपये किमतीची सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले होते. या प्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला. यावेळी चौरीचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या अविनाश सुतार आणि रजत खिलारे या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जयंती नाला परिसरातून अटक केलीय. हे दोघेही कनाननगर परिसरात राहतात. एलसीबीने अवघ्या २४ तासात या घरफोडीचा छडा लावला पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे पंधरा लाख दहा हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड जप्त केली आहे.