थकीत बिलांसाठी ठेकेदार संघटनांचे आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरूच...

<p>थकीत बिलांसाठी ठेकेदार संघटनांचे आंदोलन सोळाव्या दिवशीही सुरूच...</p>

कोल्हापूर - गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंपदा, नगरविकास आदी विभागांकडून ठेकेदारांची बिले रखडली आहेत. यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ठेकेदार संघटनांनी १५ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज सोळाव्या दिवशीही ठेकेदारांचे आंदोलन सुरूच आहे. थकीत बिलांचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.

या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार, उपाध्यक्ष सोहम दळवी यांच्यासह संदीप सावंत, किरण माळी, निलेश पाटील, प्रशांत शेलार, दयानंद शिंदे, विक्रम नलावडे, कुलदीप पाटील, आनंद पवार, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, बाळासो तुरंबे, सतीश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील ठेकेदार सहभागी झाले होते.