‘छ. शिवाजी महाराज युद्ध करताना...’: आ. संजय गायकवाड यांच्यानंतर बागेश्वर बाबा बरळले 

<p>‘छ. शिवाजी महाराज युद्ध करताना...’: आ. संजय गायकवाड यांच्यानंतर बागेश्वर बाबा बरळले </p>

नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुस्तकावरून आ. संजय गायकवाड यांचे धमकीचे प्रकरण चर्चेत असताना बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबाबत बरळले आहेत आणि विशेष म्हणजे यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख उपस्थित होते. 
बागेश्वर बाबा म्हणाले कि, 'छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, स्वामी रामदास महाराजांजवळ गेले, आता युद्ध लढणार नाही असे सांगितले, आणि राजपाट सांभाळण्यास सांगितले. रामदास स्वामींनी सांगितले की, ‘ठीक आहे, आता हे राज्य माझे आहे. शिष्याचा धर्म आहे गुरुच्या आज्ञेचे पालन करणं. त्यामुळे माझी आज्ञा ऐका आणि माझ्या राज्याचे संचालन करा'असे विधान केले आहे. या मुद्द्यांवरून आता वाद पेटला आहे.