‘या’ जिल्ह्यातील विविध प्रार्थना स्थळांवरील 938 भोंगे हटवले...
सोलापूर - कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रार्थना स्थळांवरील 938 भोंगे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी हटवले आहेत.
या भोंगे हटावच्या मोहिमेला नागरिक, धार्मिक स्थळांचे पदाधिकारी आणि विश्वस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.