आ. संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल...
कोल्हापूर - आ. संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिविगाळ केल्या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आ. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेण्यासाठी काल आ. रोहित पवार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला होता. त्यानंतर आ. गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या गुन्ह्यास आंबी कुटुंबियांनी विरोध केला आहे. या संदर्भात आंबी कुटुंबीय आज अप्पर पोलीस अधिक्षकांची भेट घेणार आहेत.