श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे चंदन लेपन पूजेचे आयोजन उत्साहात

<p>श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे चंदन लेपन पूजेचे आयोजन उत्साहात</p>

कोल्हापूर : अतिप्राचीन तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे आज पारंपरिक चंदन लेपन पूजा भक्तिभावात संपन्न झाली. वैशाख शुद्ध अष्टमी (दि. २४ एप्रिल २०२६) निमित्त ही पूजा पार पडली. 

चैत्र यात्रेनंतर सुरू होणाऱ्या ग्रीष्म ऋतूमध्ये वाढलेल्या उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी तसेच गाभाऱ्यातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी दरवर्षी संकेताप्रमाणे ही चंदन लेपन पूजा केली जाते. यात्राकाळातील उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी ही पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. यावर्षीही परंपरेनुसार श्रींच्या मूर्तीवर चंदन लेपन करण्यात आले. या पूजेत पुजक सचिन ठाकरे, सुमित भिवदने, प्रकाश सांगळे, संजय उर्फ संदीप ठाकरे, सतीश भिवदने, गणेश झुगर आणि वेदांत उपाध्ये यांनी सहभाग घेतला. भक्तांच्या उपस्थितीत आणि धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या पूजेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.