राजकीय

किरण बेदींकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील मोठी जबाबदारी..!

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नवी दिल्ली – युपीए सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारे टीममधील अनेकांना मोदी सरकारकडून २०१४ नंतर बक्षिसं देण्यात आली. यानुसार या टीममधील एक सदस्या आणि निवृत्त महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना पुडुचेरीचं नायब राज्यपाल पद देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा किरण बेदी यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) राष्ट्रीय मार्गदर्शक (नॅशनल मेंटॉर) म्हणून किरण बेदी यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ‘मित्रा’ या उपक्रमांतर्गत त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.
देशभरातील शिक्षकांना अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ऑनलाईन संवादाचे माध्यम वापरले जाणार आहे. या माध्यमातून शिक्षकांना त्यांच्या कामाशी संबंधित वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल.

संबंधित विषय

Scroll to Top