इचलकरंजी – शहरातील महानगरपालिकेने कचरा उठावासाठी मंजूर केलेल्या २२ कोटी रुपयांच्या टेंडरवरून शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या टेंडरच्या मुद्यावरून नगरसेवक संजय तेलनाडे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार राहुल आवाडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान संजय तेलनाडे यांनी ‘पैसा बोलता है’ हे गाणे लावून आमदार राहुल आवाडे यांची खिल्ली उडवली. यामुळे कचरा उठावाच्या ठेक्यावरून सुरू असलेला वाद आता राजकीय संघर्षाच्या नव्या वळणावर पोहोचला आहे.
एकीकडे २२ कोटींचा ठेका मंजूर होऊनही शहरातील अनेक भागांत कचऱ्याचे ढीग कायम असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे याच ठेक्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहे. कचऱ्याच्या प्रश्नावरून सुरू झालेली ही लढाई आता थेट राजकीय प्रतिष्ठेची बनली असून, आमदार राहुल आवाडे आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यातील संघर्ष आगामी काळात आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




