सांगली जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी महेंद्र लाड यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव
कोल्हापूर – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र लाड आणि उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर काँग्रेसचा झेंडा रोवला गेला आहे. यावर आ. सतेज पाटील यांनी, ट्वीट करत सांगली जिल्हा बॅंकेच्या विजयाबद्दल आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, “सांगली जिल्हा बँकेत आमदार जयंत पाटील साहेब, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या नेतृत्वाचा विजय!
सांगली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मानबिंदू असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे महेंद्र (आप्पा) लाड आणि उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
महाविकास आघाडी आणि सहकारी पक्षांच्या माध्यमातून सहकार, लोकशाही आणि सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या विचारांना विशेषतः काँग्रेसच्या विचारधारेतून आलेल्या नेतृत्वाकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाणे, ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या विजयामागे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीला यशस्वी आकार देणारे आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांचे विशेष अभिनंदन!”




