राजकीय

“…तर मी मनापासून त्यांची माफी मागते” : शायना एनसी

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

मुंबई – काल मुंबईमध्ये शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिंदेंच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी  हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याने खळबळ उडाली होती. यावर आज शायना एनसी यांनी  सोशल मिडीयावर जाहीर माफी मागितली आहे.

ज्यात त्यांनी म्हटले आहे कि, “बाळासाहेबांविषयी तमाम जनतेच्या मनात असलेली श्रद्धा आणि प्रेम मला पूर्णपणे समजते. माझ्यासाठी आणि कोट्यवधी लोकांसाठी बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर दैवत होते. माझ्या कृतीमुळे जर खऱ्या शिवसैनिकांच्या किंवा बाळासाहेबांच्या चाहत्यांच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी मनापासून त्यांची माफी मागते. पण, ज्यांनी माझ्या या कृतीचा विपर्यास करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की—बाळासाहेबांवरचे माझे प्रेम आणि निष्ठा सिद्ध करण्यासाठी मला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही.”

संबंधित विषय

Scroll to Top