ब्रेकिंग न्यूज
आंदोलन

अँड. स्वप्नील नाईक मारहाण प्रकरणी आज न्यायालयीन कामकाज बंद ठेवत बार असोसिएशनकडून निषेध

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पेठवडगावमधील वकील स्वप्निल नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पक्षकारांनी मारहाण केल्या प्रकरणी, तसेच पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाल्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवले होते. यादरम्यान जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयापासून मोटरसायकल रॅली काढून, मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आले.

हातकणंगले तालुक्यातील  पेठवडगाव येथील वकील स्वप्निल नाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पक्षकारांकडून मारहाण झाल्याची घटना घडली होती. या मारहाणीत ॲड स्वप्निल नाईक हे जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर योग्य पद्धतीने  उपचार केले नाहीत, तसेच पोलीस यंत्रणेकडून गुन्हा दाखल करून घेण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप वकील मंडळींनी केला होता.

या घटनेच्या निषेधार्थ आज कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांतील कामकाज बंद ठेवले. यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाजवळून  मोटरसायकल रॅली काढून निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव  यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या प्रकरणात दोषी असणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी, तसेच वकीलांच्या संरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र मंडलिक यांनी केली.  यावेळी ॲडव्होकेट धनंजय पठाडे, संपतराव पवार,  शशिकांत खोत, प्रमोद दाभाडे, सोमनाथ मुसळे,  प्रीतम पातले , नंदकुमार पाटील, चारुलता चव्हाण, नीता मगदूम यांच्यासह जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि वकील उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top