कोल्हापूर – उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही समान काम समान वेतन मिळावे, यासाठी काल न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आवारात आंदोलन केले होते. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात आर डी कांबळे, बाजीराव शिप्रे, दीपक जाधव, संजय सरनाईक, सूर्याजी देसाई, दीपा गुणे यांच्यासह सेवा निवृत्त न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.




