कोल्हापूर – गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे साखरेचा किमान विक्री मुल्य ५० रूपये प्रतिकलो व सी हेव्ही इथेनॅाल प्रतिलिटर ७० रूपये करा या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु केंद्र सरकारकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला जयसिंगपूर बार असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच या आंदोलनात जेवढे गुन्हे दाखल होणार आहेत ते सर्व गुन्हे विनामूल्य लढविणार असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे.
सध्या कर्नाटक राज्यातील हत्तरकी टोल नाका ते हुबळी येथील केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानावर लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा सुरू आहे.




