ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

पुणे शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत शिक्षकाची चिठ्ठी… शिक्षकांचा मोठा रोष

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – सर्व निवडणुकींमध्ये मतदार चिठ्ठ्यांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत असतो परंतु यावेळेस देशासह राज्यात सुरु असलेल्या घडामोडीमुळे मतदार अधिकच संतापला आहे. त्यामुळे अनेक मतदार माध्यमांसमोरही व्यक्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने आजच्या शिक्षक निवडणुकीत शिक्षकांचा मोठा रोष पहायला मिळत आहे.

नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबाद या मतदारसंघामधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. पुणे शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रावर एक चिठ्ठी सापडली आहे. आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही. जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा, अशी चिठ्ठी शिक्षक मतदाराने मतपेटीत टाकली आहे. पुरंदर तालुक्यातल्या राजेवाडी मतदान केंद्रावर चिठ्ठी टाकण्यात आली होती.

संबंधित विषय

Scroll to Top