ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

भाजपच्या ‘या’ उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

आचारसंहिता केवळ विरोधकांसाठीच वापरायची का ? : आ. रोहित पवारांचा सवाल

कोल्हापूर – आज शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यावेळी भाजपचे उमदेवार कौस्तुभ गावडे यांनी चक्क गळ्यात पक्षाचे स्कार्फ घालून मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी केलेल्या आचारसंहितेच्या भंगाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होवू लागली आहे.
यावर आ. रोहित पवार यांनी, आचारसंहिता केवळ नियमांच्या पुस्तकातच वाचायचे का? की केवळ विरोधकांसाठीच वापरायची? भाजप याला अपवाद आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे.

आ. रोहित पवार यांनी म्हटले आहे कि, आजच्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या उमेदवाराने गळ्यात पक्षाचं उपरणं घालून मतदान केलं आणि त्याचा व्हिडिओ देखील काढून प्रसारित केला. भाजपच्या उमेदवाराने लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३० चा सरळसरळ भंग केला असून, यावर ज्ञानेशकुमार काय कारवाई करणार? की एपस्टीनच्या भीतीने इथंही गप्प बसणार?
आचारसंहितेचे नियम भाजपच्या उमेदवारालाच कळत नसेल, तर शिक्षकांचे प्रश्न काय कळतील? शिक्षक शिस्तप्रिय असतात. नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुण बरोबर कापतीलच आणि सोबतच पदवीधर मतदारदेखील गुरुजनांचं अनुकरण करतील, यात शंका नाही.

संबंधित विषय

Scroll to Top