ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

खळबळजनक : तब्बल १० ते १५ शिक्षकांची नावे अचानक मतदार यादीतून गायब…शिक्षकांचा संताप

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – निवडणूक प्रक्रियेत आणि शासकीय कामात नेहमीच मोलाची भूमिका बजावणारे शिक्षकच आज लोकशाहीच्या उत्सवातून बाहेर फेकले गेल्याचा संतापजनक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. शहरातील विविध शाळांमधील तब्बल १० ते १५ शिक्षकांची नावे अचानक मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मतदानासाठी केंद्रावर पोहोचलेल्या शिक्षकांना आपले नाव यादीत नसल्याचे समजताच मोठा धक्का बसला.
भवानी मंडप परिसरातील ऐतिहासिक मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मतदान केंद्रावर काही शिक्षक मतदानासाठी आले होते. मात्र, पडताळणी दरम्यान त्यांची नावे यादीत नसल्याचे स्पष्ट झाले. असाच प्रकार शहरातील इतरही महत्त्वाच्या शाळांमध्ये निदर्शनास आला आहे.कोरगावकर हायस्कूल (सदर बाजार) वि. स. खांडेकर प्रशाला,वालावलकर हायस्कूल या शाळांमधील शिक्षकांचेही त्यांच्या संबंधित मतदान केंद्रावर नाव नसल्याचे स्पष्ट झाले असून, प्रत्येक शाळेतील १० ते १५ शिक्षकांना या समस्येचा सामना करावा लागला आहे.

सर्वसामान्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देणारे आणि निवडणुकीचा संपूर्ण डोलारा सांभाळणारे शिक्षकच जर मतदार यादीतून बेपत्ता होत असतील, तर यंत्रणेचा हा अनास्था कारभार नेमका चाललाय तरी कसा? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात येत आहे.

संबंधित विषय

Scroll to Top