ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

गोकुळचा कारभार कोणाच्या हाती..? : गोकुळ निवडणुकीचा निकाल पहा एका क्लिकवर…

एस न्यूज प्रतिनिधी अपडेट: 19 October 2026, 12:20 PM 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळच्या सार्वत्रिक निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशी लढत होत आहे. यावेळी काल पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ९९ पूर्णांक ९६ टक्के इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघातून २० सदस्य निवडण्यात येणार आहेत. त्यासाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार, तर अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधीच्या एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक लढवत आहे.

या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटींग झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये कागल, करवीर, राधानगरी,भुदरगड आदि तालुक्यातील मत पेट्यांमध्ये क्रॉस व्होटींग झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गोकुळचे माजी चेअरमन नविद मुश्रीफ आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

त्यानुसार निकाल पुढीलप्रमाणे

  • राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी
    • सर्वसाधारण प्रतिनिधी
  • विश्वासराव इंगवले-
  • विद्याधर गुरबे –
  • सचिन घोरपडे –
  • किसन चौगुले – आघाडी
  • बाबासाहेब चौगले –
  • विश्वजीत जाधव –
  • सुभाष डोंगरे –
  • अभिजीत तायशेटे – आघाडी
  • बाबासाहेब देवकर –
  • राहुल देसाई – आघाडी
  • आबा उर्फ सत्यजित पाटील –
  • उदय पाटील –
  • दादासाहेब पाटील –
  • विकास पाटील –
  • विशाल पाटील –
  • विश्वजीत पाटील –
  • शशिकांत पाटील चुयेकर – आघाडी
  • शहाजी पाटील –
  • भिमगोंडा बोरगावे –
  • रणधीर मोरे –
    • महिला प्रतिनिधी
  • भाग्यश्री डोंगळे –
  • अंजना रेडेकर – आघाडी
    • इतर मागास प्रतिनिधी
  • शशिकांत खोत – आघाडी
    • विमुक्त जाती / भटक्या जमाती प्रतिनिधी
  • बयाजी शेळके –
    • अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी
  • राजू आवळे –
  • छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी
    • सर्वसाधारण प्रतिनिधी
  • कर्णसिंह गायकवाड –
  • अंबरीषसिंह घाटगे –
  • अशोक चराटी –
  • अरुण डोंगळे –
  • मदन देसाई –
  • अजित नरके –
  • चेतन नरके –
  • अजित पाटील –
  • अमरसिंह पाटील –
  • आबाजी उर्फ विश्वासराव पाटील –
  • दीपक पाटील –
  • प्रतापसिंह पाटील –
  • युवराज पाटील –
  • रणजितसिंह के पी पाटील –
  • रणजितसिंह दिलीप पाटील –
  • राजेश पाटील –
  • राहुल पाटील –
  • सतीश पाटील –
  • संभाजी पाटील –
  • विरेंद्र मंडलिक –
    • महिला प्रतिनिधी
  • अर्चना पाटील –
  • शौमिका महाडिक –
    • इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
  • नविद मुश्रीफ –
    • अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी
  • डॉक्टर सुजित मिणचेकर –
    • विमुक्त जाती / भटके जमाती प्रतिनिधी
  • विश्वास जाधव –

संबंधित विषय

Scroll to Top