कोल्हापूर – अमूल डेअरी वाढवून गोकुळ मोडीत काढण्याचा महायुतीच्या नेत्यांचा डाव आहे आणि तसंही आमचं नेत्यांच्या पोराचं नाही तर कार्यकर्त्यांचं पॅनेल असल्याचा हल्लाबोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
गोकुळ निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांकडून सुरु असलेल्या शपथांच्या खेळीवर बोलताना राजू शेट्टी यांनी, गोकुळ निवडणुकीत महायुतीच्या ज्या नेत्यांनी ठरावधारकांना शपथा घ्यायला लावल्या, त्यांनी त्यांच्या नेत्यांशी निष्ठा राखली का?, असा सवाल त्यांनी महायुतीच्या नेत्यांना विचारला आहे.




