कोल्हापूर – गोकुळ दुध संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी 5 हजार 418 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. आज सकाळी 10 पर्यंत राधानगरीमध्ये ४२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
राधानगरीमध्ये एकूण चार केंद्र असून आज सकाळी दहापर्यंत 176 मतदारांपैकी 9, 165 मतदारांपैकी 7, 176 मतदारांपैकी 16 आणि 182 मतदारांपैकी 10 मतदारांनी मतदान केले आहे.




