ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

खळबळजनक : शिरोळ तालुक्यात बोगस मतदानाचा प्रकार

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद-आलास माळ येथील लालबहादूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ६०५ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

निखिल जगताप हे मूळ मतदार मतदानासाठी केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या नावाने अन्य व्यक्तीने मतदान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली आहे.
मूळ मतदार निखिल जगताप मतदानासाठी आल्यानंतर त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना फॉर्म क्रमांक १६ भरून मतदान करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, त्यांच्या नावाने आधी झालेले कथित बोगस मतदान नेमके कोणाच्या मतपेटीत जमा होणार आणि या प्रकाराला जबाबदार कोण, असे सवाल उपस्थित होत आहेत.
या मतदान केंद्रावर एकूण ४९९ मतदान असल्याची माहिती आहे. बोगस मतदानाच्या आरोपामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. संबंधित पोलिंग एजंट किंवा अधिकाऱ्यांकडून जबाबदारी निश्चित झाली नसल्याचा आरोपही केला जात आहे. सदर जगताप यांचे आधारकार्ड वापरून मतदान झाले आहे जगताप दवाखान्यात उपचार घेत होते त्या वेळेत कोणीतरी मतदान करून गेले. दवाखान्यातून उपचार घेऊन मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त करत निवडणूक विभागाच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेनंतर मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर काय कारवाई होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top