ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

पदवीधर / शिक्षक निवडणुकीच्या मतमोजणीत अजब कारभार…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

उमेदवारांवर अनेक नियमांचा भडीमार तर जेवणासाठी कार्यकर्त्यांची झुंबड

पुणे – आज विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या पाच जागांसाठी पुण्यात मतमोजणी होत आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज करण्यात आली आहे परंतु या निवडणुकीत मतमोजणीवेळी मोठा बोजबारा उडाला आहे.
या निवडणुकीच्या मतमोजणीवेळी उमेदवारांना मतदान केंद्रावर प्रवेश करताना मोठी नियमावली लावण्यात आली आहे. उमेदवारांना केंद्रात प्रवेश करताना पेन, कागद, घड्याळ घेवून जाण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मत नोंदवताना उमेदवारांचा मोठा गोंधळ होत आहे यामुळे उमेदवारांकडून मतमोजणीच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हे एकीकडे सुरु असताना दुसरीकडे जेवणासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top