ब्रेकिंग न्यूज
निवडणूक

खळबळजनक : मतपेट्यांचं सील तुटलेलं…काहीवेळ मतमोजणी प्रक्रिया थांबली…!

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये तब्बल 182 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.
मतमोजणीला सुरुवात होताच आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदा देशमुख यांनी केला आहे. या दाव्यामुळे मतमोजणी केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. या गोंधळामुळे काहीवेळ मतमोजणी प्रक्रिया थांबवली असल्याची माहिती समोर आली आहे.


महाविकास आघाडीचे सर्व प्रतिनिधी एकत्र जमले आहेत, आतमध्ये तारा आणि सील तुटलेले असताना आम्ही त्यावरती आक्षेप घेतला, त्यावरती आम्हाला सांगितलं गेलं हे बरोबर आहे, आमची तक्रार देखील नोंद करून घेतली नाही, व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं, आम्हाला सांगितलं की ते व्हिडीओ रेकॉर्डिंग आम्ही तुम्हाला देऊ, पण ते देणार कधी, आज निवडणूक आहे, तेथील निवडणुकीतले निरीक्षक आहेत त्यांच्यासमोर आम्ही आमची तक्रार नोंदवली, त्यावर ते काहीही बोलत नाही, पुढे ते म्हणतात काम चालू करा, त्यामुळे आमच्या तक्रारीला काहीही अर्थ नाहीये, त्या मतपेटीमध्ये कोणत्या उमेदवाराचं मत आहे, हे आम्हाला माहिती नाही, ते विरोधकांचं असेल आमचं असेल, पण तिथे ज्या ज्या उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, त्या सर्वांनीच यावरती आक्षेप घेतलेला आहे, पक्षीय, अपक्षीय सर्वांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे. आम्ही अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अधिकारी तिथे आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी कागद पाहिला, कागदाचं सील आहे, वरती असलेलं लाखेचं सील तुटलेलं आहे, तरीसुध्दा कागदाचं सील आहे म्हणत त्यांनी प्रोसिड म्हणजेच काम चालू करा असं सांगितलं, तिथे सात ते आठ पेट्या अशा निघाल्या त्याचे सील तुटलेलं आहे, ते मतदान कोणाला दिलेलं आहे, माहिती नाही, पण असं सील तुटणं ही गंभीर बाब आहे, निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

संबंधित विषय

Scroll to Top