ब्रेकिंग न्यूज
सहकार

तुमच्याकडे ४४०० ठरावधारक तर मग शपथ घेण्याची वेळ का ? : आ. सतेज पाटील यांचा सवाल

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – मंत्री चंदकांत पाटील यांनी महायुतीकडे चार हजार चारशे ठराव असल्याच्या दावा केलाय यावर आमदार सतेज पाटील यांनी, जर चार हजार चारशे ठरावधारक आहेत तर शपथ घ्यायची वेळ का येते आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गोकुळ निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ आज करवीर तालुक्यातील चुये येथून झाला. यावेळी ते बोलत होते.

सरदार वल्लभभाई पटेल फेडरेशनचे संकट थोपवण्याची क्षमता महायुतीमध्ये नाही. क्षमता असती तर सहा महिने वाद का केला, आमच्या संस्था अवसायनात का गेल्या, आम्हाला कोर्ट कचऱ्या का कराव्या लावल्या, असा सवाल करून फेडरेशनचे आलेलं संकट राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी सत्तेत आल्यावर नक्की थोपवेल, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

जाहीरनाम्यात शास्त्रोक्त आणि अभ्यास करूनच आश्वासने देण्यात आली आहेत. महायुतीचे पॅनलच येणार नसल्याने ते जाहिरनामा देवू शकत नसल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी केली.

संबंधित विषय

Scroll to Top