ब्रेकिंग न्यूज
सहकार

त्यांच्या बाजूला बलाढ्य मंत्रिमंडळ असले तरी आमच्या बाजूला गोकुळचे जन्मदाते : ऋतुराज पाटील यांचा घणाघात

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळच्या निवडणुकीची जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या बाजूला बलाढ्य मंत्रिमंडळ असले तरी आ. सतेज पाटील यांच्या बाजूला गोकुळचे जन्मदाते असल्याचं,माजी आमदार ऋतुराज पाटील म्हटले आहे . ते करवीर तालुक्यातील चुये येथील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रगतीत गोकुळ दूध संघाचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे गोकुळ टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं. गोकुळचा कोणताही निर्णय घेण्यासाठी मुंबईला फोन करावा लागतो. म्हणजेच गोकुळ मुंबईमध्ये नेऊन ठेवला आहे तो आपल्याला कोल्हापुरातच ठेवायचा आहे. गोकुळच्या चाव्या कोल्हापूर जिल्ह्यातच ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असेही त्यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top