कोल्हापूर – गोकुळच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. सतेज पाटील यांना राज्याचे नेतृत्व दिले असून या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांना आ. सतेज पाटील चितपट करतील, असा विश्वास ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी व्यक्त केला आहे. ते करवीर तालुक्यातील चुये येथील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.
एक माणूस लढतोय आणि महाराष्ट्राचे पूर्ण मंत्रिमंडळ आ. सतेज पाटील यांना पाडण्यासाठी प्रयत्न करतय . म्हणजे आमदार सतेज पाटील यांची किती ताकद आहे हे यातून दिसून येते, असे म्हणत त्यांनी, कोल्हापुरातील सर्व पाटलांनी एकत्र यावं आणि पाटलांना विजय करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले आहे.




