कोल्हापूर – गेल्या सहा महिन्यांमध्ये महायुतीमध्ये जो काय तमाशा झाला त्या तमाशाचे उत्तर या गोकुळ निवडणुकीच्या माध्यमातून मिळणार असल्याचा घणाघात आ. सतेज पाटील यांनी केला आहे . ते करवीर तालुक्यातील चुये येथील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.
सध्या महायुतीमध्ये एकमेकांच्या शपथा घ्यायच्या सुरु झाल्या आहेत. पण आमच्या मुख्य नेत्यांनी गोकुळमध्ये एकत्र राहण्याचं तसंच राजकारण आणायचं नाही अशा पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या शपथांचं काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आ. सतेज पाटील म्हणाले कि, गोकुळ दूध संघ टिकला तर उद्या शेतकऱ्यांचं भवितव्य टिकणार आहे. त्यामुळे संस्था वाचवण्यासाठी ही लढाई सुरु झाली आहे. जिल्ह्याचं अर्थकारण जिवंत ठेवायचे असेल तर गोकुळ टिकवावा लागणार आहे.
चिन्ह वाटपातही राजकारण झालं .परंतु आम्हाला विजयाची शिट्टी वाजवायची आहे म्हणून आम्हाला शिट्टी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.




