आघाडीकडून “जाहीरनामा” प्रसिद्ध
कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीच्या २५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने आज आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.
यामध्ये शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले, उदय पाटील, बाबासाहेब विष्णू देवकर, आबा उर्फ सत्यजित सुरेश पाटील, अभिजित प्रभाकर तायशेटे, किसन बापूसो चौगले, रणधीर विजयसिंह मोरे, सचिन दौलतराव घोरपडे, विश्वजीत दिनकरराव जाधव, राहुल बजरंग देसाई, दादासाहेब वसंतराव पाटील, विकास पांडुरंग पाटील, भिमगोंडा कल्लाप्पा बोरगांवे, विद्याधर बाबुराव गुरबे, सुभाष बळवंत डोंगरे, विशाल गोपाळराव पाटील, विश्वजीत रणजितसिंह पाटील, शहाजी केशव पाटील, विश्वासराव आनंदराव इंगवले,
महिला राखीव गटातून अंजना केदारी रेडेकर, भाग्यश्री धीरज डोंगळे, इतर मागासवर्गीय गटातून शशिकांत शामराव खोत, अनुसुचित जाती-जमाती गटातून राजु जयवंतराव आवळे, भटक्या जाती / विमुक्त जमाती गटातून बयाजी देवू शेळके आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.
यावेळी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचा संयुक्त “जाहीरनामा” आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, शेकापचे माजी आमदार जयंत पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला.




